नृसिंहवाडी येथे नदीत बुडून मळगावातील युवकाचा मृत्यू…

2

सावंतवाडी.ता,०५: येथील नृसिंहवाडी देवदर्शनासाठी गेलेल्या मळगाव येथील युवकावर काळाने घाला घातला आहे. त्याठिकाणी पोहण्याचा आनंद घेत असताना तो बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी घडली.केशव सीताराम राऊळ (वय)२६ असे त्याचे नाव आहे.त्याचा मृतदेह आज सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह मळगाव येथील गावी आणण्यात येणार आहे.
राऊळ हा आपल्या मित्रांसमवेत नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी गेला होता.दर्शन झाल्यानंतर मित्रांसमवेत तो बाजूला असलेल्या कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याने काठावर येण्याचा प्रयत्न केला,परंतू त्याचे प्रयत्न फसले तो पाण्यात बुडाला.याबाबतची माहिती मिळताच मळगाव गावावर शोककळा पसरली आहे.

4