Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याब्रेकिंग मालवणीच्या कार्यालयाला पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची भेट...

ब्रेकिंग मालवणीच्या कार्यालयाला पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची भेट…

सावंतवाडी.ता,०५: येथील यशवंतराव मुक्त विद्यापीठ पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आज ब्रेकिंग मालवणीच्या कार्यालयाला भेट दिली.

यावेळी कामकाजाची माहिती घेतली यावेळी विद्यार्थी व कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यात प्रश्न उत्तरे झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी संपादकीय व सोशल मीडियावर कोणत्या पद्धतीने कामकाज चालते.याची माहिती घेतली.सावंतवाडी येथे यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून श्रीराम वाचन मंदिर यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आज केंद्राचे संयोजक श्री राजेश मोंडकर यांच्या उपस्थित भेट घेण्यात आली.यावेळी ब्रेकींग मालवणीचे अमोल टेंबकर, उपसंपादक भक्ती पावसकर,जिल्हा जाहीरात प्रतिनिधी सावली पाटकर,व्हीडीओ एडीटर रोहित पोकळे प्रतिनिधी निखील माळकर,अजय भाईप,योगिता बेळगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी रजत सावंत ,सुजाता धडाम ,स्वप्नाली मेस्त्री,सुप्रिया पाटील,पल्लवी तारी,गणेश चव्हाण आदींनी माहीती घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments