मडु-यात रेल्वेतुन पडल्याने परप्रांतीय प्रवासी जखमी…

149
2

बांदा.ता,०४: 
मडूरे रेल्वेस्टेशन नजीक सावंतवाडी – दिवा पॅसेंजर गाडीतून परप्रांतीय प्रवासी पडून गंभीर जखमी झाला. रोणापाल – आंब्याचे गाळू येथील रेल्वे ब्रीजनजीक ही घटना घडली. रेल्वे कर्मचार्‍यांनी मडूरे स्टेशन मास्तर इजाज शेख यांना या अपघाताची माहिती दिली. स्टेशन मास्तर शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा परप्रांतीय कन्नड भाषेत बोलत होता. १०८ रुग्णवाहिकेतून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताबाबत बांदा पोलीसांना रेल्वे प्रशासनाने माहिती दिली. जखमी प्रवाशाची भाषा समजत नसल्याने त्याचे नाव समजू शकले नाही.

4