सावंतवाडी पत्रकार संघाचा पुरस्कार ब्रेकिंग मालवणीच्या शुभम धुरींना जाहीर…

481
2

निवड समितीकडून जाहीर;

लोंढे,भिसे,शिरसाट,राणे यांचाही समावेश….

सावंतवाडी.ता,०५: येथील पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्ता चंदू ऊर्फ हरीश्चद्र वाडीकर पुरस्कार ब्रेकींग मालवणीचे ब्युरो चीफ शुभम धुरी यांना जाहीर करण्यात आला.पुरस्कार समितीची बैठक आज येथे झाली.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई सचिव अमोल टेंबकर,रामचंद्र कुडाळकर,निवड समितीचे सदस्य डाॅ.उत्तम पाटील, प्रा. गणेश मर्गज आदी उपस्थित होते.
पुरस्कार समितीच्यावतीने यातील नावे सुचविण्यात आली. यात माजी आमदार जयानंद मठकर यांच्या नावाने देण्यात येणारा जेष्ठ पत्रकार पुरस्कार अरविंद शिरसाट यांना जाहीर करण्यात आला. तर मे. द. शिरोडकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार लोकमतचे काका उर्फ महादेव भिसे यांना देण्यात आला.डाॅ.अजय स्वार यांच्याकडून देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार लोकसत्ता व रत्नागिरी टाईम्सचे प्रतिनिधी अभिमन्यू लोंढे यांना जाहीर करण्यात आला.
तर ज्येष्ठ पत्रकार बाप्पा धारणकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार तरूण भारतचे उपसंपादक अर्जुन राणे यांना देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते चंदू उर्फ हरिश्‍चंद्र वाडीकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार यांना जाहीर करण्यात आला ही निवड प्रक्रिया आज येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पार पडली.

 

 

4