जिल्ह्यातील ६०० ग्रामीण डाक सेवक संपात सहभागी होणार ; अभिमन्यू धुरी यांची माहिती…
मालवण, ता. ०५ : देशातील सुमारे तीन लाख ग्रामीण डाक सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ८ जानेवारी रोजी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. जिल्ह्यातील ६०० ग्रामीण डाक सेवक संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती ग्रामीण डाक सेवक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी यांनी दिली.
केंद्र सरकारने ३ लाख ग्रामीण डाक सेवकाना सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी कमलेशचंद्र गुप्ता अध्यक्षीय समिती स्थापन केली. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी देऊनही डाक सेवक वंचित आहेत. निवृत्तीनंतर पाच लाख ग्रॅज्युटी मिळावी. २०१६ पासून निम्मा राहिलेला फरक मिळावा. कामगार कायद्यात बदल करून कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातून ६०० ग्रामीण डाक सेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अभिमन्यू धुरी व जे. एम. मोडक यांनी केले.