रूजूल पाटणकर; सीबीएससीचा बोर्डासाठी पहीली दुसरीसाठी प्रवेश प्रकीया सुरू…
सावंतवाडी.ता,०५: येथील
सीबीएससीच्या धर्तीवर सावंतवाडी कोलगाव निरूखे येथे “स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल” या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून भविष्यातील विद्यार्थी घडविण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी यावर्षीपासून पहिली व दुसरी इयत्तेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक श्री रुजुल पाटणकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान आपल्या मुलांना शिक्षण देताना या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर अन्य कोणत्याही छंदासाठी अन्य ठिकाणी प्रवेश घ्यावा लागणार नाही. एकाच छताखाली खेळ गायन-वादन यांच्यासह कराटे कुकींगचे धडे देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे मुलांची नाष्टा सोबत जेवण्याची सोय करण्याची जबाबदारी प्रशालेकडून घेण्यात आली आहे. असेही यावेळी श्री पाटणकर यांनी सांगितले.येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी नबीला हेरेकर,निशा कामत उपस्थित होत्या.
सावंतवाडी सर्वोदय नगर येथील वाॅव किड्स रायन या प्राथमिक शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.त्यांच्या सोबत निशा कामत व लबिला हेरेकर या शिक्षिकाही उपस्थित होत्या.
श्री पाटणकर माहिती देताना म्हणाले की,वाॅव किड्स रायन प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या यशस्वी वाटचालीनंतर सीबीएससी च्या धर्तीवर जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणारी संस्था याठिकाणी असावी या हेतूने माझी वाटचाल सुरू असतानाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी मला प्रेरित करत वाव किड्स रायन च्या प्राथमिक शिक्षणानंतर मुलांना इतर शैक्षणिक संस्थेत पाठवता आपणच पुढचे शिक्षण देणारी संस्था उभारा असे सांगितले त्यामुळे पालकांची अपेक्षा लक्षात घेता गेल्यावर्षीपासून सावंतवाडी पासून दहा किलोमीटर अंतरावर कोलगाव निरुखे येथे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सुरू करण्यात आले पहिल्याच वर्षी पहिलीचा वर्ग सुरू करण्यात आला दहावीपर्यंत मान्यता असलेल्या संस्थेत टप्प्याटप्प्याने वर्गांचा विस्तार करण्यात येणार आहे या वर्षी पहिली ते दुसरी हे दोन वर्ग सुरू करण्यात येणार असून यासाठीची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे.
श्री पाटणकर पुढे म्हणाले सीबीएससी च्या धर्तीवर या ठिकाणी दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक क्षमतेसाठी विविध उपक्रमही आम्ही राबवत आहोत यामध्ये विविध प्रकारच्या मैदानी खेळावर आमचा भर असणार आहे तशा प्रकारच्या मैदानाची रचनाही संस्थेच्या इमारत परिसरात करण्यात आली आहे शैक्षणिक बाबतीत विचार करता एखादा विषय मुलांच्या लक्षात न आल्यास तोच विषय त्याच दिवशी पुन्हा हा मुलांना शिकवला जातो एका वर्गात जास्तीत जास्त 35 मुलांना ऍडमिशन देऊन दोन शिक्षक हा नवीन उपक्रम संस्था राबवित आहे एका शिक्षकांकडून अभ्यासक्रम शिकवला जातो तर दुसऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यावर लक्ष ठेवण्यात येतो. शिवाय अभ्यासाचा कुठलाही ताण विद्यार्थ्यावर दिला जात नाही शिक्षणाबरोबरच शेती विषयक धडेही विद्यार्थ्यांना दिले जातात त्याचे प्रात्यक्षिक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिले जाते याचबरोबर दररोज योगा शिकवला जातो.
राज्यात होणारे महिलांवरील अत्याचार लक्षात घेता प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कराटे प्रशिक्षण हे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे कराटेचे प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात येते. याशिवाय शाळेच्या दिवाळीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे दोन खेळ याठिकाणी शिकवले जाते आठवड्याच्या दोन टप्प्यात या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते नृत्य गायन संगीत आधीवरही संस्था भर देत असून एक परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा संस्थेचा मानस आहे असे श्री पाटणकर यांनी सांगितले.