उत्तर गोव्यातील सत्तरी येथे पट्टेरी वाघाचा मृत्यू …

2

कारण अस्पष्ट;गोवा शासन व वनखात्याचा दुर्लक्ष झाल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप..

पणजी.ता,०५:
उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यात गोळावली येथे चार वर्षीय पट्टेरी वाघ मृतावस्थेत सापडला.ही घटना आज सकाळी उघड झाली.
वाघाचा मृत्यू आठवडयाभरा पूर्वी झालेला असण्याची शक्यता आहे.कुजलेल्या अवस्थेत सापडला मृत वाघाचे उद्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे.त्यानंतर कारण स्पष्ट होणार आहे.असे वन अधिका-याकडुन सांगण्यात आले.
एप्रिल २००९ मध्ये केरी येथे वाघाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच पुनश्च एकदा म्हादई अभयारण्यात संशयास्पद वाघाचा मृत्यू चिंता निर्माण करणारा ठरत आहे.असे पर्यावरणप्रेमी विठ्ठल शेळके यांनी सांगितले तर म्हादई अभयारण्यात वाघांचे वास्तव्य असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले असले तरी गोवा सरकार आणि गोव्याचे वनखाते याकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याचा आरोप ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केला आहे.

4