महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना वैभववाडीच्यावतीने जिल्हाधिका-यांना निवेदन
वैभववाडी.ता,०६:
शासनाने शिक्षकांना लागू केलेली डीसीपीएस ही पेन्शन योजना रद्द करावी. व जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क शिक्षक संघटना वैभववाडीच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतर राज्य सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने जुनी पेन्शनचा न्याय हक्क नाकारला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर हा एक अन्याय आहे. डीसीपीएस पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. दिल्ली सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या शासनाने जुनी पेन्शन योजना राज्यात लागू करावी असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यासाठी देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष दादा ठोंबरे, सचिव समिर सरवणकर, योगेश खोसरे, राजेंद्र पाटील, विनोद खंडागळे, राहूल गावडे, युवराज पचकर, स्वप्नील तोडकर, स्वप्नील गुरखे व शिक्षक उपस्थित होते.