कणकवली नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिशिर परुळेकर…

149
2

कणकवली, ता.०६: कणकवली नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिशिर परुळेकर यांची निवड नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज जाहीर केली. स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी नगरपंचायतीची विशेष सभा आज झाली. महेंद्र सांब्रेकर यांनी राजीनामा दिल्याने स्वीकृत नगरसेवकपद रिक्त झाले होते. श्री.परुळेकर हे भाजपच्या जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीनंतर खासदार नारायण राणे, नीलमताई राणे, आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली आदींनी अभिनंदन केले.
आज सकाळी अकरा वाजता कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा झाली. यात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शिशिर परुळेकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर श्री.परुळेकर यांचे सर्व उपस्थित नगरसेवकांनी अभिनंदन केले. तर ओम गणेश निवासस्थानी खासदार नारायण राणे, नीलमताई राणे, आमदार नीतेश राणे यांनी अभिनंदन केले.

4