रंगकर्मी करंगुटकरांना आदरांजली; कुटुंबीयांचा सन्मान…
वेंगुर्ले ता.०६: तालुक्यातील श्री देव नारायण युवा कला मंच,आसोली यांनी मुंबईत सादर केलेल्या मालवणी भाषेतील “सोरगत” या दोन अंकी नाट्यप्रयोगाला रसिकांची चांगलीचं दाद मिळाली.असोली गावातील रंगकर्मी स्व.रमेश करंगुटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई-दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कै.श्री.करंगुटकर यांच्या पत्नी रिमा करंगुटकर व मुलगा रोहन करंगुटकर यांचा श्री देव नारायण युवा कलामंचच्या वतीने सत्कार करण्यात आला.दरम्यान या नाटकाचा शुभारंभ सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास मंडळ मुंबईचे भास्कर केरकर,सुरेश धुरी,आरवलीचे दिलीप साळगावकर,सायली धुरी,प्रशांत शेरके,स्वप्नील धुरी,रघुनाथ गावडे,निखिल घाडी,गुरुनाथ घाडी, सागर गावडे ,एकनाथ परब,विनायक करंगुटकर आदी उपस्थित होते.
असोली गावातील रंगकर्मी कै.करंगुटकर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या अनेक आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला.याप्रसंगी अनेकांना आपले नयनअश्रू आवरता आले नाही.
य प्रसंगी सादर करण्यात आलेल्या,सोरगत या नाटका दरम्यान अनेकांच्या नजरेत करंगुटकरांच्या आठवणी ताज्या झाल्या.या नाट्य प्रयोगाचा उपस्थित कोकण प्रांतातील तसेच मुंबईकर रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला,तर मालवणी भाषेतील विनोदी नाट्य संवादांनी नाट्यगृहात एकचं
हास्य कल्लोळ उठविला होता.
या नाटकाचे दिग्दर्शन अमित गावडे यांनी केले,तर या नाटकात विकी केरकर,शैलेश धुरी,विद्याधर जाधव,बंटी कांबळी,सुप्रिया हळदणकर,श्रुती घाडी,शुभम धुरी,ममता गावडे,संदीप धुरी,जगदीश गावडे,भूषण धुरी,लक्ष्मण नाईक आदी कलाकारांनी आपल्या भूमिका साकारल्या होत्या.