अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत वेताळ प्रतिष्ठानचे आयोजन : १२ गटात २९२ स्पर्धक सहभागी…
वेंगुर्ले : ता.६ : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत सलग ७व्या वर्षी आयोजित खुल्या फिट इंडिया मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या पुरुष गटातून सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनातील वैभव सुर्यकांत नार्वेकर यांनी तर सलग ३ ऱ्या वर्षी खुल्या महिला गटातून पारपोली – सावंतवाडी ची रसिका बाळकृष्ण परब अव्वल क्रमांकाची मानकरी ठरली. भारत सरकारच्या सुदृढ भारत अभियान अंतर्गत वैयक्तीक निरोगी आरोग्याचा संदेश देणाच्या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने तुळस येथे आयोजित जिल्हास्तरीय फिट इंडिया मॅरेथॉन स्पर्धेस शालेय मुली- मुलगे, व खुल्या पूरुष व महिला अशा एकूण १२ गटातुन जिल्ह्यातील सुमार २९२ स्पर्धकांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
सदर मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन आंतराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडू तथा उदयोजिका अनुजा तेंडोलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उद्योगपती दादासाहेब परुळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नाना राऊळ, निवृत्त क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर, जनता विद्यालय तळवडेचे शिक्षक बांगर, अजय नाईक, जागृती कला क्रीडा मंडळाचे दिलीप मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निरोगी आरोग्य विषयक संदेश देणारी क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.
सदर स्पर्धेत शालेय गटातून प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे : *गट १ली -२री (मुले)* १. सार्थक संजय परब (गिरोबा विद्या. तुळस), २.कर्तव्य तेजस बांदिवडेकर (वजराठ नं १), ३. देवराज रामचंद्र घारे ( विवेकानंद विद्या. तुळस) *गट १ली- २री (मुली)* १. मान्यता संदीप पेडणेकर (एम.आर .देसाई स्कुल), २. दिया दिलीप मालवणकर ( जागृती मंडळ), ३. भक्ती गोविंद भणगे (वेताळ विद्या. तुळस), *इ.३री – ४थी (मुले)* १. हर्ष प्रवीण होडावडेकर (वेताळ विद्या. तुळस), २. सार्थक विकास खानविलकर (कुडाळ), ३. प्रज्वल प्रदीप परुळकर (वेताळ विद्या. तुळस). *इ.३री – ४थी (मुली)* १. शमिका सचिन चिपकर (कुडाळ), २. नयना दत्तात्रय भाटकर (परबावाडा नं १), ३. अक्षरा अशोक राऊळ
(वेताळ विद्या तुळस). *इ. ५वी-६वी (मुले)* १. तेजस रामचंद्र राऊळ ( जैतीर विद्या. तुळस), २. सखाराम कृष्णा तुळसकर (जैतीर विद्या तुळस), ३. विठ्ठल राजेश गुडेकर (कळसुलकर हाय). *इ. ५वी-६वी(मुली)* १. स्नेहा संजय नार्वेकर (मदर तेरेसा वेंगुर्ला), २. ईशा संजय नाईक
(होडावडा नं१), ३. प्रतीक्षा नितीन पवार ( परबवाडा नं १) *इ. ७वी-८वी (मुले)* १. समीर हनुमंत वडर (जागृती), २. आर्यन अशोक चव्हाण (नेमळे हाय.), ३. श्रेयस दीपक काळसेकर (परबवाडा नं १) *इ. ७वी-८वी(मुली)* १. प्राप्ती प्रशांत गावडे (अणसूर हाय), २. हर्षली आनंद धुरी (वजराठ नं १), ३.प्रगती अर्जुन दळवी
(जनता विद्या) *इ. ९वी-१०वी (मुले)* १. साहिल गजानन परब (शिवाजी हाय तुळस), २. दत्ताराम महादेव पालयेकर (शिवाजी हाय), ३. विराज विठ्ठल भुते (उभादांडा हाय).
*इ. ९वी-१०वी(मुली)* १. साक्षी राजन कोरगावकर (जनता विद्या तळवडे), २. सायली बाबल परब (जनता विद्या) यांनी यश संपादन केले. तर खुल्या पुरुष गटात अनुक्रमे वैभव सूर्यकांत नार्वेकर (सिंधुदुर्ग पोलीस), संतोष सदाशिव वेंगुर्लेकर (कोचरा -वेंगुर्ला), निहाल चंद्रकांत तुळसकर ( तुळस- वेंगुर्ला) यांनी तर खुल्या महिला गटातून रसिका परब(पारपोली सावंतवाडी), नीरा बाबू आईर (बांदा), स्वप्नाली देऊ टिळवे (साळगाव) या प्रथम तीन क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. वेताळ प्रतिष्ठान सातत्याने सलग ७ वर्षे विविध क्रीडा स्पर्धाचे दर्जेदार आयोजन करून जिल्ह्यातील खेळाडूंना संधी देत क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकीक मिळवीत असल्याचे सांगत आतंरराष्ट्रीय खेळाडू अनुजा तेंडोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व विजेत्या स्पर्धकांना १२ जानेवारी रोजी मान्यवराच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व सचिन कॉमर्स क्लासेस वेंगुर्ला च्या स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन किरण राऊळ यांनी तर आभार कुंदा सावंत यांनी मानले.