2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सरपंच खान व नागरिकांची कारवाई;खेमराज हायस्कूल परिसरातील प्रकार…
बांदा.ता,०६:
बांदा खेमराज हायस्कुलनजीक संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन परप्रांतीय महिलांना सरपंच अक्रम खान व नागरिकांनी बांदा पोलिसांच्या ताब्यात दिले.
खेमराज प्रशालेनजीक ठराविक अंतरावर या महिला उभ्या होत्या. तेथून जाणाऱ्या शहरातील एका महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न या महिलांनी केला. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर येथीलच सचिन वीर यांनी याची कल्पना सरपंच अक्रम खान यांना दिली. खान यांनी याची कल्पना बांदा पोलिसांना दिली.
हवालदार ज्योती हरमलकर व विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेली तिसरी महिला तेथून पलायन करण्यात यशस्वी झाली. दरम्यान सदर महिला बांदा आठवडा बाजारात कसरतीचे खेळ करण्यासाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4