Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ले तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत शर्व,चार्वी,वरदा,निरज प्रथम...

वेंगुर्ले तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत शर्व,चार्वी,वरदा,निरज प्रथम…

जागृती फेस्टिव्हल अंतर्गत आयोजन;स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

वेंगुर्ला ता.०६: येथील जागृती फेस्टिव्हल अंतर्गत घेतलेल्या तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत बालवाडी गटात शर्व आपटे, १ ली ते २ री गटात चार्वी राऊळ, ३ री ते ४ थी गटात वरदा परब व ५ वी ते ९ वी गटात नीरज पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
वेंगुर्ला येथील जागृती क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे जागृती फेस्टीव्हलचे आयोजन केले होते. यावेळी विविध गटातील वेशभूषा स्पर्धा ४ जानेवारी रोजी पार पडल्या. तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे-बालवाडी गट- प्रथम -शर्व बाबुराव आपटे, द्वितीय-सानवी मनीष सातार्डेकर, तृतीय-मनस्वी सुहास रेडकर, उत्तेजनार्थ-रिया दिलीप मालवणकर, देवेश भगवान नावार, १ली ते २ री गट-प्रथम-चार्वी राऊळ, द्वितीय-चिन्मयी रोजन जोशी, तृतीय-पाशा सुजित चमणकर, उत्तेजनार्थ-अंजली सचिन करंगुटकर, सर्वेश उमेश परब, ३ री ते ४ थी गट -प्रथम-वरदा संदीप परब, द्वितीय-शमिका राजन अरावंदेकर, तृतीय-गांधार प्रदीप जोशी, उत्तेजनार्थ मकरंद सुदेश वेंगुर्लेकर, श्रेयस नरेश वाडेकर, ५ वी ते ९ वी गट – प्रथम-नीरज विश्वास पवार, द्वितीय-जयेश रमेश सोनुर्लेकर, तृतीय-गंधाली अनंत केळुस्कर, उत्तेजनार्थ-लतिका सुजित चमणकर, भैरवी महेंद्र घाडी. या सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments