उमेश यादव आत्महत्या प्रकरणाला मुलीकडुन “फुलस्टाॅप”…

2

आमची कोणतीही तक्रार नाही,कोणाचा दबाव नाही;कृतिका यादव…

सावंतवाडी ता.०६: माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण बंद करा,आमची कोणा विरूध्दही तक्रार नाही,संशय नाही,जे काही म्हणणे असेल ते आणि आवश्यक पुरावे आम्ही पोलिसांकडे मांडले आहेत.त्यामुळे आता यावर चर्चा नको,अशी भूमिका आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आत्महत्या करणाऱ्या उमेश यादव यांची मुलगी कृतिका यादव यांनी मांडली आहे.ही घटना घडल्यानंतर जे राजकीय लोक आमच्या कुंटूबांला येवून भेटले त्यांचे आम्ही आभार मानतो,असेही यावेळी त्यांनी सांगितले.

2

4