वेंगुर्ला :ता.६ कोल्हापूर येथे प्रोक्टीव्ह अॅबॅकस तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेत तेजस्वी अॅबॅकस वेंगुर्ला मधून एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कु. वेद अभिषेक वेंगुर्लेकर याने ह्या स्पर्धेत आपल्या लेवल मधून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या त्याचा यशासाठी तेजस्वी प्रोक्टीव्ह अॅबॅकस चे शिक्षक श्री. मनोज शारबीद्रे यांचे मार्गदर्शन लाभले होते. कु. वेद हा वेंगुर्ले येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्र ४ चा विध्यार्थी असून या यशाबद्दल त्याचा आज शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका सौ. संध्या बेहेरे, शिक्षक श्री. संतोष परब, श्री. राजू वजराठकर, श्री. संतोष बोडके , सौ. खंडागळे मॅडम, पालक सौ. साक्षी वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान २३ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अॅबॅकस स्पर्धेत कु. वेद सहभागी होणार असल्याने त्याला शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेत वेंगुर्ले शाळा नं.४ चा विद्यार्थी वेद अभिषेक वेंगुर्लेकर राज्यात प्रथम….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES