एक जखमी; संशयितांविरूध्द सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सावंतवाडी ता.०६: किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत आडेली-कामळेवीर येथील वृद्ध जखमी झाला आहे.तारक गोविंद पाटकर (६८),असे त्यांचे नाव आहे.ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेमळे-वेंगुर्लेकरवाडी येथे घडली.याबाबत श्री.पाटकर यांनी संशयित वासुदेव मुठेकर रा.नेमळे याच्या विरोधात सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.पाटकर हे नेमळे येथे शिवनीची झाडे पाहण्यासाठी गेले होते.दरम्यान त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या संशयित मुठेकर याने आपल्यावर हल्ला केला.हातातील चाकुने माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.मात्र तो वार मी माझ्या हातावर झेलला,त्यामुळे माझ्या हाताला दुखापत झाली.तर त्यानंतर त्याने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली,असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.