जिल्ह्यातील आठही तालुक्यांना समान न्याय देणार…

2

समिधा नाईक ; मालवण पंचायत समितीस दिली भेट…

मालवण, ता. ०६ : जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा समिधा नाईक यांनी आज मालवण पंचायत समितीस भेट दिली. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला असून आठही तालुक्यांना समान न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे त्यांनी स्पष्ट केले.
मालवण पंचायत समितीच्या सभापती दालनात सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांचे स्वागत केले. यावेळी सदस्या उन्नती धुरी, सुनील नाईक आदी उपस्थित होते. मालवण किनारी वाढत्या दुर्घटना विचारात घेता उपाययोजना करण्याची सूचना राजू परूळेकर यांनी केली. त्यावर नाईक यांनी आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्‍वासित केले. तालुक्यातील कोणत्याही समस्या घेऊन या, त्याचा पाठपुरावा करताना योग्य न्याय मिळवून दिला जाईल असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

4