Friday, December 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedपर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना करा...

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना करा…

सभापती पाताडे, उपसभापती परुळेकर ; बंदर निरीक्षकांचे वेधले लक्ष…

मालवण, ता. ०६ : मालवणचे पर्यटन जगाच्या नकाशावर झळकत आहे. अशा परिस्थितीत अलीकडच्या काळात पर्यटन करताना होणार्‍या दुर्घटनांमुळे येथील पर्यटनाची मोठी हानी होत आहे. राज्यातून येणार्‍या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याकडे केली.
मालवण, दांडी, देवबाग किनारी गेल्या महिनाभरात पाच दुर्घटना घडल्या. त्यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर बंदर विभाग, संबंधित प्रशासनाला जाग आणण्यासाठी सभापती, उपसभापती यांनी बंदर विभागाच्या अधिकार्‍यांची आज सायंकाळी भेट घेत चर्चा केली. पर्यटकांच्या वाढत्या अपघातांमुळे पर्यटनावर संक्रात येऊ शकते. त्यामुळे पर्यटकांना दर्जेदार सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. पर्यटकांना मार्गदर्शक, धोक्याची सूचना देण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असलेल्या किनार्‍यावर जीवरक्षकांची तत्काळ नियुक्ती करावी. पर्यटन क्षेत्रात होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. पर्यटकांचा जीव गेल्यावर कार्यवाही करण्यापेक्षा त्यांचे लाखमोलाचे जीव वाचविणे आपले कर्तव्य आहे असे श्री. पाताडे, श्री. परुळेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या वतीने मुंबईत दोन दिवसात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येत आहे अशी माहिती बंदर निरीक्षक श्री. ताम्हणकर यांनी दिली. वाढत्या दुर्घटनांमुळे मालवणच्या पर्यटनाबाबत चुकीचा संदेश राज्यभर पोचत असल्याने त्या बैठकीत आम्ही मांडलेल्या सूचना मांडाव्यात. येथील पर्यटन बहरावे, अपघात घडू नयेत, पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात अशी आमची भूमिका असल्याचे श्री. परुळेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments