सावंतवाडीत ८ जानेवारीपासून देशभक्त कोरगावकर व्याख्यानमाला…

134
2

सावंतवाडी ता.०७: येथील श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारी देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला ८ जानेवारी सुरू होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन अनंत घोडगावकर व पल्लवी कोरगावकर यांच्या उपस्थित होणार आहे.या व्याख्यानमालेत मिलिंद इनामदार,ज्ञानेश्वर बंडगर,शुभांगी थोरात,दत्ता मोरे,अविनाश पाटील आदी वक्ते सहभागी होणार आहेत.तर या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष प्रवीण बांदेकर यांनी दिली.यावेळी कार्यवाह रमेश बोंद्रे उपस्थित होते.
श्री बांदेकर पुढे म्हणाले आठ जानेवारीपासून सुरू होणारी ही व्याख्यानमाला पाच दिवस चालणार आहे.यावेळी उपस्थित सर्वानी उपस्थित राहावे,असे आवाहन वाचन मंदिरच्या माध्यमातून दीपक नेवगी,प्रवीण बांदेकर,रमेश बोन्द्रे यांनी केले आहे.

4