सावंतवाडी ता.०७: भाजपचे युवा नेते माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडीतील उमेश यादव कुटुंबीयांची आज भेट घेत त्यांचे सांत्वन केले.यावेळी काळजी करू नका,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,अशा शब्दात त्यांनी यादव कुटुंबियांना धीर दिला.यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी संदीप कुडतरकर,ॲड.अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडीतील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर उमेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी येथील मोती तलावात उडी घेत आत्महत्या केली होती.या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत येत आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांनी यादव कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.