जिल्हा भाजपा करणार सावंतवाडीत विजयोत्सव साजरा…

2

चंद्रकांत पाटील,नारायण राणेंची प्रमुख उपस्थितीत; “अमर,अकबर,अँथोनी”चे स्वागत…

सावंतवाडी ता.०७: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाकडुन राबविण्यात आलेला “अमर,अकबर,अँथोनी” हा फॉर्म्युला यशस्वी करण्याबरोबर विजयाचे शिल्पकार ठरलेल्या सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह बांदा सरपंच अक्रम खान व आंब्रड जिल्हा परिषद लॉरेन्स मानेकर यांच्या स्वागतासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आज सावंतवाडीत येत आहेत.भाजपाच्यावतीने या तिघांच्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी येथील गांधी चौकात विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे,माजी आमदार राजन तेली,माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सावंतवाडी तालुका भाजपाचे अध्यक्ष महेश सारंग व शहराध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.

8

4