जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत आंबोली पब्लिक स्कूलचे यश…

2

बांदा.ता,०७:
सिंधुदुर्ग जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने येथील खेमराज मेमोरियल प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंगचे विजेतेपद आंबोली पब्लिक स्कुलने मिळविले. त्यांनी एकूण ३० सुवर्ण, १० रौप्य व २ कांस्य पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत राजा शिवाजी विद्यालय, विलवडे प्रशालेने १८ सुवर्ण, ४ रौप्य व ४ कांस्य पदकासह द्वितीय स्थान मिळविले. कृष्णा कराटे क्लब, वेंगुर्लेने ११ सुवर्ण, ८ रौप्य व १ कांस्य पदकासह तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन बांदा सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी सोनू दळवी, किरण देसाई, सुमेधा सावळ, सुहास बांदेकर, आयोजक रुपेश गावडे, पुंडलिक हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत रुपेश गावडे यांनी केले.
अक्रम खान म्हणाले की, खेळामुळे स्पर्धकांना पोलीस भारतीत संधी मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले तर आभार निकिता गावडे यांनी मानले. ही स्पर्धा विविध वयोगटात खेळविण्यात आली. संपूर्ण स्पर्धेत आंबोली पब्लिक स्कुलच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले.
स्पर्धेत पंच म्हणून ओंकार पवार, साईराज सावंत, कृष्णा गावडे, मकरंद गवस, तेजस परब, गजानन कोकरे, नितीन कानोजी, रमेश राठोड, निकिता गावडे, निखिल गावडे, विशाखा परब, राजेश्वरी नार्वेकर, सोनम राऊळ यांनी काम पाहिले.

4