यापुढील सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार…

2

चंद्रकांत पाटील;विधानसभेत चिन्ह मिळाले असते, तर चित्र वेगळे असते…

सावंतवाडी.ता,०७: आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवू, विधानसभेत भाजपा उमेदवार चिन्हावर लढले असते.तर वेगळे चित्र दिसले असते.मात्र आता सुरू करू असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले राणे भाजपात आल्यानंतर ब-याच जागा या ठीकाणी भाजपाकडे आल्या.ही कौतुकाची बाब आहे.विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना एबी फाॅर्म द्यावा अशी मागणी अनेक वेळा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्याकडे केली होती.मात्र आपण युतीचा धर्म पाळला परंतू शिवसेनेने तसे केले नाही.त्यामुळे आम्ही अयशस्वी झालो.परंतू आता येणा-या निवडणुका आम्ही भाजपा म्हणून स्वबळावर लढणार आहोत.

राणे पुढे म्हणाले शिवसेना भाजप युती व्हावी असे मला वाटत नव्हते. पण निवडणूकीनंतर शिवसेने कडून दगा फटका केला. त्यामुळे सिंधुदुर्गातुन आता शिवसेना संपवा.आपण सावंतवाडीतील जनतेचे आभार मानत आहोत. प्रथमच भाजपचा सावंतवाडीत नगराध्यक्ष बसला आहे.२३ वर्षानी हे यश मिळाले आहे.सर्व जण सोबत असल्याने यश मिळाले.पक्ष मजबूत करणे हेच ध्येय आता बाळगा महाराष्ट्रातील चिंता करू नका
ते पुढे म्हणाले भाजप कोणत्या गोष्टीत कमी पडू नये यासाठी आता भाजप कार्यकत्यामध्ये आक्रमकता आली पाहिजे.हा गुण कार्यकर्त्यांचा आणा अशी मागणी नारायण राणे यांनी प्रदेशाध्यक्षाकडे केली. एक दादा दुसरया दादाचा ऐकतो अशी टिपण्णी ही राणे यांनी केली

4