एका दादाचे दुसरे दादा ऐकतात…

333
2
Google search engine
Google search engine

नारायण राणे;भाजपाने आता आक्रमक होण्याची गरज…

सावंतवाडी/अमोल टेंबकर.ता,०७:येथील भाजपाने आता प्रामाणिकपणा निष्ठे सोबत आक्रमक व्हावे असे माझे मत आहे.अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.वरून एका दादाचे दुसरे दादा ऐकतात असे सांगण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे सभागृहात हशा पिकला व खुद्द पाटील यांनी स्मितहास्य करून त्याला प्रतिसाद दिला.
येथे आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीत श्री राणे बोलत होते.यावेळी ते म्हणाले आगामी काळात होणा-या निवडणूकात भाजपाच विजयी झाली पाहीजे.त्यासाठी कोकणातून विरोधक संपविण्यासाठी प्रयत्न करू,भाजपा रायगड पर्यत वाढविण्याची जबाबदारी आमची असा ही राणेंनी शब्द दिला.