विजेत्या संघाचा ७५ हजार व एस.एस.एस. चषक देऊन होणार गौरव…
वेंगुर्ले.ता.७: तालुक्यातील सातेरी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ कर्ली आयोजित श्री उमेश शामसुंदर सामंत पुरस्कृत कै. श्यामसुंदर श्रीपाद सामंत स्मृती एस.एस.एस चषक भव्य क्रिकेट स्पर्धा दिनांक २२ ते २६ जानेवारी २०२० दरम्यान कर्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ७५ हजार व एस.एस.एस. चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
श्री देवी सातेरी मैदान कर्ली येथे होणाऱ्या या स्पर्धेतील उपविजेत्या संघास ४० हजार व एस एस एस चषक तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी ५ हजार उपांत्य फेरीतील चारही संघांना एस.एस.एस टी शर्ट देण्यात येणार आहेत. याच दरम्यान ग्रामीण गटातील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघास १५ हजार व उपविजेत्या संघास १० हजार व एस. एस. एस चषक देण्यात येणार आहे. तरी इच्छुक संघाने आपली नावे दीपक दुधवडकर ९१४५२५५०४५ यांच्याकडे द्यावी असे आव्हान सातेरी कला क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.