खरंच बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री बसवण्याचा शब्द घेतला होता का…?

2

चंद्रकांत पाटलांचा नारायण राणे यांना व्यासपीठावर प्रश्न,उध्दव ठाकरेंवर टिका…

सावंतवाडी ता.०७: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री बसवण्याचा शब्द उद्धव ठाकरेंकडून घेतांना तुम्ही पाहिले होते का ? ,असा प्रश्न आजच्या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केला.तुम्ही त्यांच्या खूप जवळ होता,कदाचित त्यामुळे तुम्हाला माहित असेल,असेही त्यांनी यावेळी खोचकपणे सांगत,ज्यांना शेतीमधले राज्यातले काही कळत नाही,अशा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसविण्यात आल्याची टीका, श्री.पाटील यांनी यावेळी केली.
भाजपच्या वतीने जिल्ह्यात झालेल्या तीन विजयानंतर आज येथील गांधी चौकात भव्य मेळावा घेऊन विजयोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री.पाटील बोलत होते.यावेळी ते म्हणाले याठिकाणी आणि द्रोह करून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.मात्र या ठिकाणची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही.भविष्यात नक्कीच मध्यंतरी निवडणुका होणार आहेत.त्यामुळे त्या दृष्टीने कामाला लागा,असे आवाहन यावेळी श्री.पाटील यांनी केले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.ते म्हणाले शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा आहे,असे खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सांगितले,असे वारंवार उद्धव ठाकरे सांगत आहेत. मात्र त्यांनी असे सांगितले होते का ? असा प्रश्न त्यांनी व्यासपीठावर नारायण राणे यांना विचार श्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे,जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक,माजी आमदार राजन तेली,अतुल काळसेकर ,जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार,तालुकाध्यक्ष महेश सारंग,नगराध्यक्ष संजू परब,शहर अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर,राजेंद्र म्हापसेकर,अजित गोगटे,सुदन बांदीवडेकर,संदीप कुडतरकर,परिमल नाईक,आदी उपस्थित होते.

4