नारायण राणेंचा सवाल;जिल्ह्यासाठी एकत्र येवूया,पाय खेचण्याचे पाप नको…
सावंतवाडी ता.०७: दीपक केसरकर यांनी जिल्ह्याला जाहीर केलेले दीड हजार कोटी रुपये गेले कुठे ?,चष्म्याचा कारखाना गेला कुठे ?,असा खोचक सवाल आज येथे आयोजित मेळाव्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी करीत आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता टीका केली.तसेच त्यांनी काहीच काम केले नसल्याने त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही,असाही आरोप त्यांनी केला.
जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊया.पाय खेचण्याचे पाप नको,असे आवाहन आज येथे कार्यक्रमात केले.सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय मेळाव्यात बोलत होते.यावेळी राणे म्हणाले,जिल्ह्याचा विकास होणे गरजेचे होते.मात्र माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फक्त घोषणांचा पाऊस पडला.या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत वास्तव विकास झालेला नाही.कोट्यावधी रुपये आणल्याचे त्यांनी वारंवार सांगितले.मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात म्हणावा तसा विकास झालेला नाही.
यावेळी श्री.पाटील यांच्या हस्ते संजू परब,लॉरेन्स मानियेकर,अक्रम खान यांच्यासह सर्व पंचायत समिती सभापती उपसभापती ,जिल्हापरिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे,जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक,माजी आमदार राजन तेली,अतुल काळसेकर ,जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार,तालुकाध्यक्ष महेश सारंग,नगराध्यक्ष संजू परब,शहर अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर,राजेंद्र म्हापसेकर,अजित गोगटे,सुदन बांदीवडेकर,संदीप कुडतरकर,परिमल नाईक,आदी उपस्थित होते.