वेंगुर्ले.ता.८:वेंगुर्ले-चर्मकारवाडी, नातूचाळ व नगरवाचनाल शेजारील पावसाळी गटाराच्या बाजूने असणाऱ्या लगतच्या घरातील नागरिकांना या गतरातील दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांची विशेष सभा आज ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जुन्या मारुती मंदिरात आयोजित केली आहे.
या भागातील नागरिकांनी २६ जानेवारी २०१८ रोजी या प्रश्नावर सामूहिक उपोषण केले होते. मात्र अजून पर्यंत या विषयी न.प.प्रशासनाने ठोस उपाय योजना केली नाही. परिसरातील सर्व इमारती मधील सांडपाणी या गटारामधून जात आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी ही सभा आहे. तरी सर्वांनी वेळेत यावे असे आवाहन नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.