ऑनलाईन विक्री विरोधात सावंतवाडीत मोबाईल दुकानदारांचा बंद…

2

सावंतवाडी.ता,०८: येथील ऑनलाईन प्रक्रियेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज येथील मोबाईल दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला.या बंदमध्ये शहरातील अनेक मोबाईल दुकानदार सहभागी झाले होते.ऑनलाईन प्रक्रियेमुळे मोबाईल धारकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे हा बंद पुकारण्यात आला होता.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथे संबंधित मोबाईल धारकांचे अधिवेशन होत आहे.या अधिवेशनात ऑनलाईन प्रक्रिये विरोधात जोरदार आवाज उठवला जाणार आहे.दरम्यान या संपाला आज सावंतवाडीतून पाठिंबा जाहीर करण्यात आला.

4