जिल्हा परिषदेच्या विज्ञान शिबिरात आजगाव केंद्र शाळेचे यश…

2

वन्यप्राण्यांना पळवून लावणाऱ्या तोफेच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक…

वेंगुर्ले.ता,०८: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात आजगाव केंद्र शाळेने सादर केलेल्या “वन्य प्राण्यांना पळून लावणारी तोफ” या प्रतिकृतीला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला.याबद्दल शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेकडून अभिनंदन करण्यात आले.प्रणव मेस्त्री व नूतन मुळीक या दोन मुलांनी ही प्रतिकृती सादर केली होती.दत्तगुरु कांबळी या शिक्षकांनी याच्यासाठी मार्गदर्शन केले होते.

4