……अखेर तिलारी-रामघाट वाहतूकीस खुला…

2

पाच महीने होता रस्ता बंद; ग्रामस्थ,प्रवाशांनी साजरा केला आनंद…

दोडामार्ग ता.०८: मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तब्बल पाच महिन्यापूर्वी कोसळलेला तिलारी-रामघाट रस्ता आज अखेर एसटी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.अनेक दिवसा नंतर या ठिकाणावरून एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली.यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी एसटी चालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
हा घाट पावसात कोसळला होता.त्यामुळे परिसरातील बेळगाव,चंदगड,कोल्हापूर आदीसह सिंधुदुर्ग व गोवा राज्याकडे येणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली होती.पावसाळ्यात घाट दुरुस्त करणे शक्य नसल्याने ते काम संथगतीने सुरू होते.दरम्यान तब्बल पाच महिन्या नंतर हा घाट सुरू करण्यात आला.आज या ठिकाणाहून एसटीची वाहतूक सुरू झाली.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.

4