जिल्हा परिषदेच्या क्रीडा महोत्सवात डींगणे शाळेच्या अशोक कदमचे यश…

2

बांदा.ता,०८:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बाल कला क्रीडा महोत्सवात ५० मी. धावण्याच्या शर्यतीत जिल्हा परिषद शाळा डिंगणे नं .१ चा विद्यार्थी अशोक सोमा कदम याने प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्ह्यातील सर्वात वेगवान धावपटू बनण्याचा बहुमान मिळवला व तो जिल्हा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.
अशोकने ५० बाय ४ रिले प्रकारात जिल्हास्तरावर आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्रआंगणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक महादेव कदम, प्रिया करमळकर, सुनील पाटील, विश्राम ठाकर यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्याचे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख अनंत कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फटू सावंत यांनी अभिनंदन केले आहे. शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

4