दुरुस्तीसाठी दिलेली बोलेरो पिकप गॅरेजमधून चोरीस…

2

तळवडे येथील घटना; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल…

सावंतवाडी ता.०८: तळवडे सिद्धेश्वर मंदिर नजीक एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी दिलेली बोलेरो पिकप गाडी चोरीस गेल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.गुरुनाथ रामा आचरेकर रा.म्हाळईवाडी,असे गाडी मालकाचे नाव आहे.दरम्यान या बाबतची तक्रार गॅरेज मालक शैलेश गजानन शेटकर (४०) रा.तळवडे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली.त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्री शेटकर हे रोजच्या प्रमाणे काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपले गॅरेज बंद करून घरी परतले.त्यांनी आपल्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली श्री.आचरेकर यांची (MH.07-P.36 19) ही बोलेरो पिकप गाडी आपल्या गॅरेज बाहेर उभी केली होती.सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते गॅरेज उघडण्यासाठी आले असता गॅरेज बाहेर उभी असलेली संबंधित गाडी त्यांना दिसली नाही.दरम्यान ती गाडी चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दिली.त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4