बांदा ग्रामपंचायत सदस्य हर्षद कामत यांना मारहाण…

330
2

दोन गटातील वाद मिटवताना घडला प्रकार; एका विरुद्ध गुन्हा दाखल…

बांदा ता.०८
शहरातील बांदेश्वर मंदिर नजीक स्टॉलधारकांशी झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेले ग्रामपंचायत सदस्य हर्षद प्रकाश कामत याना येथील युवकाने मारहाण केली. कामत यांच्या डोक्यात दगड मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कामत यांनी आज बांदा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी साईश महेश गोवेकर (वय २३, रा. बांदा) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदेश्वर मंदिरनजीक वामन कृष्णा यांचा स्टॉल आहे. या स्टॉलवर खरेदिवरून साईश व वामन यांच्यात वाद झालेत. त्यावेळी तेथून जात असलेले ग्रामपंचायत सदस्य कामत यांनी दोघांतील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी साईश व कामत यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. साईश याने आपल्या डोक्यात दगड मारल्याचे कामत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. कामत यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.

4