सुंदरवाडी महोत्सव फेब्रुवारीत आयोजित करणार…

2

संजू परब;सावंतवाडी महोत्सव मे महिन्यात घेण्याचा विचार…

सावंतवाडी ता.०९: सुंदरवाडी महोत्सव फेब्रुवारीत घेतला जाईल,तर सावंतवाडी महोत्सव मे महिन्यात घेण्याचा विचार आहे.त्या बाबत लवकरच नियोजन करण्यात येणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी नगरसेवक मनोज नाईक,परिमल नाईक,आनंद नेवगी,दीपाली भालेकर,अमित परब,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

श्री.परब पुढे म्हणाले,कालच मी माझ्या सोबत काही नगरसेवकांना घेऊन येथील भाजी मंडईची पहाणी केली.यावेळी अनेक ठिकाणी झाडी वाढल्याचे आढळून आले.तर ठीक-ठिकाणी गटार तुंबल्या मुळे दुर्गंधी पसरली आहे.याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.तसेच रंगरंगोटी करून हे मार्केट लवकरच सुस्थितीत केले जाईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले,येथील भाजी मंडईत ग्रामीण भागातील विक्रेते सुद्धा येत असतात,मात्र त्यांना या आधी याठिकाणी बसण्यासाठी जागा चांगल्या सुविधा मिळत नव्हत्या,आता आम्ही त्यांना योग्य सुविधा मिळवून देणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

4