सावंतवाडीत १२ जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन…

2

संजू परब यांची माहिती ;१५० पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती….

सावंतवाडी ता.०९: केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. येथील नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना श्री परब पुढे म्हणाले,स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश असून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील एकूण सात उद्योजक यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून १५० जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.यात उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता प्रमाणे निवड करून रोजगाराची संधी देण्यात येणार आहे.त्यासाठी जास्तीत-जास्त युवकांनी आपला बायोडेटा घेऊन या रोजगार मेळाव्यात उपस्थित रहावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

4