गजमुख गावडे °खर्डेकर श्री° तर दर्शन गडेकर °ज्युनिअर खर्डेकर श्री°…
वेंगुर्ला : ता.९ वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात आंतरवर्गीय शरिरसौष्ठव स्पर्धेत गजमुख गावडे याने ‘खर्डेकर श्री‘ तर दर्शन गडेकर याने ‘ज्युनिअर खर्डेकर श्री‘ पटकाविला आहे.बॅ. खर्डेकर महाविद्यालयात ‘युवा स्पंदन‘ महोत्सव अंतर्गत कै.काकासाहेब चमणकर स्मृतीप्रित्यर्थ जगदीश चमणकर पुरस्कृत व किशोर सोन्सुरकर संचलित श्री सातेरी व्यायाम शाळा मार्गदर्शित आंतरवर्गिय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन तहसिलदार प्रविण लोकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सातेरी व्यायाम शाळेचे संस्थापक किशोर सोन्सुरकर, युवा महोत्सव समिती चेअरमन दिलीप शितोळे, सुरेंद्र चव्हाण, डॉ.आनंद बांदेकर, स्पर्धेचे विरेंद्र देसाई, प्रा.प्रकाश शिदे आदी उपस्थित होते. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून युवा पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल, दगदगीच्या जीवनात बैठे काम यामुळे आपल्या फिजिकल फिटनेसकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल वापर कमी करुन शरीर प्रबळ, स्वास्थ्य व तंदुरुस्त रहावे याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन तहसिलदार प्रविण लोकरे यांनी केले. विद्यार्थी चौकाचौकात मोबाईलवर असतात युवा पिढी वेगळ्या दिशेने पाऊल टाकत आहेत. शरीर चांगले ठेवण्यासाठी मैदानी खेळाकडे तरुण पिढीने वळले पाहिजे असे आवाहन पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये स्वतःचे वलय निर्माण केले असल्याचे गौरवोद्गार जयप्रकाश चमणकर यांनी काढले. शरीरसौष्ठव स्पर्धेत दर्शन गडेकर याने ‘ज्युनिअर खर्डेकर श्री‘, दिपक जाधव-द्वितीय, सिद्धेश गावडे-तृतीय तर गजमुख गावडे याने ‘खर्डेकर श्री‘, गौरव मठकर-द्वितीय, ओंकार परब-तृतीय, प्रथमेश गावडे-चतुर्थ, रोहित धुरी-पावचा, हर्षद मठकर याने सहावा क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण हेमंत नाईक, संतोष किर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.वाय.नाईक यांनी तर आभार किशोर सोन्सुरकर यांनी मानले.