वीरधवल परब; आसोली हायस्कूलचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात…
वेंगुर्ले ता.०९: विद्यार्थ्यांनी प्रयत्नातून यश मिळविल्यास ते दीर्घकालीन आनंद देते,त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिभेच्या सामर्थ्याने आपली ओळख महाराष्ट्राला करून द्यावी,असे प्रतिपादन कवी वीरधवल परब यांनी येथे केले.येथील आसोली हायस्कूलचा स्नेहसंमेलन मेळावा मुंबई येथील लक्ष्मी ट्रॅव्हल्सचे मालक निशिकांत धुरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री.परब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
यावेळी दादा परूळेकर,यशवंत धुरी,शिवराम आरोलकर,रमण किनळेकर,माजी गटशिक्षणाधिकारी श्री.पिंगुळकर,मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश धुरी,ग्रामविकास मंडळाचे सेक्रेटरी सदानंद गावडे,विजय धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी आदर्श विद्यार्थी महादेव धुरी तर आदर्श विद्यार्थिनी प्रणिता पाटलेकर व उत्कृष्ट खेळाडू कुणाल धुरी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी वेशभूषा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमात अभ्यासविषयक सहशालेय उपक्रमांविषयी खेळांच्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले.तसेच यावेळी घेण्यात आलेल्या हस्तकला व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन निशिकांत धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे शिक्षक लक्ष्मण शिरोडकर यांनी केले.सूत्रसंचालन व अहवाल लेखन विष्णू रेडकर व सौ.धुरी यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापिका विषाखा वेंगुर्लेकर यांनी केले.या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक हितचिंतक आणि आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.