सम्राट राणे; समर्थनम ट्रस्ट फाॅर द डीसेबल्स संस्थेचा पुढाकार…
ओरोस ता.०९: समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड, बेंगलोर या संस्थेमार्फत दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे मोफत रोजगार प्रशिक्षण दिले जात आहे. ३ मिहिन्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्यांखासगी संस्थांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी १० पास ची अट असून या मोफत रोजगार प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रशिक्षक सम्राट राणे यांनी केले आहे.
दिव्यांग बांधवांना सक्षम बनविण्यासाठी समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड, बेंगलोर ही संस्था कार्यरत आहे. या संस्थचे २३ राज्यात शाखा आहेत. त्या ठिकाणी ही संस्था दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत आहे. ही संस्था दिव्यांग बांधवांना एल आर सी प्रशिक्षण, बेसिक कॅम्प्यूटर कोर्स, इंग्लिश कम्युनिकेशन लाईफ स्किल्स टेलरिंग, डी टी पी, फोटो शॉपी, टैली, हार्डवर्क-नेटवर्किंग, हॉस्पिटलती, रिटेल आदि विविध प्रकारचे मोफत रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण बेंगलोर येथे दिले जाणार आहे. हे प्रशिक्षन पूर्णतः मोफत असून यावेळी प्रशिक्षण साहित्य, राहण्याची सोय, जेवण मोफत दिले जाणार आहे. या साठी लाभार्थी हा किमान १० वी पास असणे आवश्यक असून ३ महिन्याचे हे प्रशिक्षण असणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्यांना खासगी संस्थांमध्ये नोकरीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या मोफत रोजगार प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा तसेच ०८३१-२४४५१५३ वर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे प्रशिक्षक सम्राट राणे यांनी केले आहे.