रस्ते अनुदानातून मंजूर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ…

2

मालवण, ता. ९ : पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या प्रभागात रस्ते अनुदानातून मंजूर झालेल्या शेख गॅरेज ते कोळंब जोड रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज ज्येष्ठ नागरिक शरद आचरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, गणेश कुडाळकर, भाई कासवकर, शिल्पा खोत, नगरसेविका सुनीता जाधव, उमेश मांजरेकर, बाबू गांगनाईक, नरेश हुले, वैभव तोंडवळकर, कमलाकर खोत, पालाश चव्हाण, दीपा शिंदे, बंड्या सरमळकर, यशवंत गावकर, प्राजक्ता गांगनाईक, शांती तोंडवळकर, प्रणाली गायकवाड, ज्योती पाडावे, विद्या मसुरकर, गणेश चिंदरकर, अम्मी शेख, आशिष शेडगे, दीप पवार, नंदा सारंग, दिलीप पवार, दिया पवार, अक्षय भोसले, गुणी प्रभू झांटये यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून विविध रस्त्यांच्या डांबरीकरण कामांना सुरवात करण्यात आली आहे. गतिमान व दर्जेदार पद्धतीने ही कामे मार्गी लावली जाणार असल्याचे बांधकाम सभापती यतीन खोत यांनी स्पष्ट केले.

4