प.पू. विनायक अण्णा महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनाथांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप…

2

कुडाळ,ता.०९: अण्णा महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या शुक्रवारी जिल्ह्यातील अनाथ आश्रम मूकबधिर शाळांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

आपण समाजात वावरताना समाजाचे देणे लागतो. ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे.अहंकार ही वृत्ती सोडा सर्वांशी प्रेमाने वागा त्या प्रेमातच ईश्वराचे रूप आहे. असे प्रतिपादन संत राऊळ महाराज मठाचे मठाधिपती परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज यांनी आज केले. अण्णा महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या औचित्य साधून उद्या शुक्रवारी दि.१० सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनाथाश्रम मूकबधिर कर्णबधिर शाळांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे.
परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या १३ मार्च २०२० या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मार्च २०१९ पासून संपूर्ण सिंधुदुर्गसह,पुणे, मुंबई,गोवा,पंढरपूर.आदी भागात विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक,आदी. विविध कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन मार्च २०१९ पासून सुरू आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उद्या दि.१० रोजी माऊली मतिमंद निवासी कोंडुरा तालुका सावंतवाडी जीवदान मतिमंद विशेष शाळा झाराप एम् फोर सेवा बांदा सुरेश बिर्जे चॅरिटेबल ट्रस्ट अनाथ आश्रम माड्याचीवाडी, सविता आश्रम पणदुर,जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रम अणाव या जिल्ह्यतील कर्णबधिर मतिमंद अनाथ आश्रम यांना देण्यात येणाऱ्या जीवनावश्यक साहित्याचा शुभारंभ आज अण्णा महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी एम.के गावडे, प्रज्ञा परब, एस.पी सामंत, सुरेश बिर्जे, विकास कुडाळकर,सुंदर मेस्त्री, दशरथ राऊळ,अजित राऊळ, विठोबा राऊळ, राजन पांचाळ, परशुराम गंगावणे, राजेंद्र सामंत, दादा चव्हाण, निळकंठ राऊळ, नारायण सावंत, महेंद्र कुडकर, उमेश धुरी, नवीन बांदेकर, अशोक पवार, सुनंदा पवार, सुवर्णा कुडकर, प्रसाद कांडरकर, पांडुरंग गोडे, बाबल निचम, प्रकाश पिंगुळकर,भास्कर धुरी, विनायक जोशी, लक्ष्मण कुडकर, दिलीप प्रभू , हंजनकर सदाशिव प्रभू, मधुकर जोशी, प्रमोद तेंडुलकर मंडळ अधिकारी गवस, ग्रामसेवक गावकर, साळुंके, राऊळ महाराज भक्तजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना अण्णा राऊळ महाराज म्हणाले जीवनात वाटचाल करताना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देणे लागतो. ही उदात्त भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे व भविष्यात मोठे झाल्यावर ती आचरणात आणली पाहिजे.गुरु-शिष्य परंपरा याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. समाजाच्या प्रवाहात वावरताना प्रत्येकाने अहंकार अहंभावला दूर ठेवून प्रेमाने वागले तरच यामध्ये ईश्वर सुख सामावलेले आहे.असे सांगत समाजाच्या अखंडापर्यंत आपला हा समाजसेवेचा वसा सुरूच राहील यासाठी तुमचे सर्वांचे सातत्याने मिळणारे सहकार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या एम.के गावडे यांनी सुद्धा अण्णा महाराजांच्या माध्यमातून केवळ अमृतमहोत्सवी वर्षात नव्हे तर गेली कित्येक वर्षे त्यांनी घेतलेले समाजसेवेचे व्रत त्यांचा सर्वांशी असणारा जिव्हाळा यातच खऱ्या अर्थाने तुम्ही परमेश्वर शोधत आहात अनाथ निराधार अपंग यांच्या सेवेतच धन्यता माना कारण त्यांच्या सेवेतच खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्याला दर्शन होतअसल्याचे सांगितले.
पिंगुळी परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनाथ आश्रम मूकबधिर शाळांना जीवनावश्यक साहित्य वितरण करण्यात येणार आहे. त्या साहित्य समवेत अण्णा महाराज, पूजनीय बाईमा, एम.के गावडे, प्रज्ञा परब,एस.पी सामंत उपस्थित असणार आहेत.

20

4