शेर्ले येथील श्री देव रवळनाथाचा लोटांगणांचा आज जत्रोत्सव

2
  • सावंतवाडी/अजय भाईप,
    शेर्ले येथील श्री देव रवळनाथ देवाचा लोटांगणासाठी प्रसिध्द असलेला जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवसाला पावणारा देव म्हणून श्री देव रवळनाथ त्याची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यामुळे याठिकाणी देवाच्या दर्शनासाठी तसेच नवसाची लोंटागणे घालण्यासाठी अनेक भाविक त्या जत्रौत्सवास गर्दी करतात. आज सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासून अभिषेक पूजा नवस फेडणे आधी कार्यक्रम होणार आहेत.तर सायंकाळी पालखी निवडणूक होणार आहे रात्री उशिरा लोटांगण हा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे यावेळी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव रवळनाथ जत्रोत्सव समितीच्यावतीने गावकरी व मानकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

20

4