निगुडे येथील शेतकऱ्यांचा वेंगुर्ले,निळेली येथे अभ्यास दौरा…

2

निगुडे,ता.१०: ग्रामपंचायत निगुडे १४ वित्त आयोग अंतर्गत शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला होता. यावेळी कुडाळ- निळेली पशु संवर्धन केंद्र याठिकाणी भेट दिली,त्या ठिकाणचे प्रमुख डॉ.कविटकर यांनी अझॉन नावाच्या पशुखाद्याची निर्मिती कशी केली. त्याचा उपयोग कसा करावा यासंदर्भात माहिती दिली.

त्याचप्रमाणे शेळीपालन, गो-पालन, गांडूळ खत प्रकल्प निर्मिती कशी करावी यासंदर्भात सविस्तर माहिती श्री.कविटकर यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथील कृषी सहाय्यक श्री एस. एस. मापुस्कर यांनीही सविस्तर पणे काजू कलम वेंगुर्ला १ ते न ९ तसेच आंब्यांच्या विविध जातींची माहिती शेतकऱ्यांना सांगितली. यावेळी निगुडे ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे, ग्रामपंचायत सदस्य विठू गवंडे, लक्ष्मी दळवी, समीक्षा गावडे, ईशा तुळसकर, ग्रामसेवक तनवी गवस, पोलीस पाटील सुचिता मयेकर, सावंतवाडी गावठी बाजार अध्यक्ष श्रीम. शर्मिला नाईक, धनंजय सावंत राजेश मयेकर, वसंत निगुडकर, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

6

4