फुकेरी येथे गोवा व सिंधुदुर्ग मर्यादित भजन स्पर्धा…

2

बांदा,ता.१०:फुकेरी येथील श्री देवी माऊली कला व क्रीडा मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग व गोवा राज्य मर्यादित भजन स्पर्धा रविवार १९ जानेवारी रोजी आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार ५५५ रुपये व स्मृतीचिन्ह, द्वितीय ३ हजार ३३३ व स्मृतीचिन्ह, तृतीय २ हजार २२२ स्मृतीचिन्ह तसेच उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक, तबला/पखवाज वादक यांना प्रत्येकी ७७७ रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, श्री देव हनुमंत माउली मंडळ अध्यक्ष प्रकाश आईर उपस्थित राहणार आहेत. श्री देवी माऊली मंदिर सभागृहात होणार्‍या स्पर्धेसाठी भजन मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी ९८२२१०२४०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

4