ग्रामस्थांत भितीचे वातावरण;योग्य बंदोबस्त करण्याची मागणी…
बांदा,ता.१०:बांदा-डिंगणे रस्त्यावर पाशिवाडी येथे भर रस्त्यात वाहन चालकांना भल्या मोठ्या गव्याचे गुरुवारी सांयकाळी दर्शन झाले. यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांत
भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डिंगणे परिसरात भर दिवसाही गवेरेडे रस्त्यावर व भर वस्तीत नजरेस पडत आहेत. यामुळे दिवसाढवळ्या
देखील येथून प्रवास करणे चालकांसाठी धोकादायक बनले आहे.
या रस्त्यावर नेहमीच गव्यांचा कळप दृष्टीस पडतो. स्थानिकांना कित्येकवेळा गव्यांचे दर्शन झाले आहे. यापूर्वीही गव्यांनी बहुतेक वेळा रस्ता अडविल्याचे डिंगणे उपसरपंच जयेश सावंत यांनी सांगीतले. उपद्रवी प्राण्यांचा वावर या परिसरात वाढल्याने वनविभागाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थामधून होत आहे.