किरकोळ कारणावरून पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला…

269
2
Google search engine
Google search engine
Google search engine

इन्सुली बिलेवाडी येथील घटना; जखमी महीलेला गोवा बांबुळीत हलविले

बांदा.ता,१०:  आपापसातील भांडणातून पतीने कोयत्याने मानेवर वार करून पत्नीला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना
इन्सुलि-बिलेवाडी येथे आज सकाळी घडली. यामध्ये सौ. शोभा तात्याराम साठे (वय ४४, मूळ रा. बीड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी (गोवा) येथे हलविण्यात आले. पत्नीला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पती तात्याराम साठे (वय ४८, मूळ रा. बीड, सध्या रा. इन्सुलि) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बांदा पोलीस स्थानकात सुरू आहे. या घटनेने इन्सुलि गावात खळबळ उडाली आहे.

\