रात्रौची घटना:शॉर्टसर्किटमुळे प्रकार, सुदैवाने नुकसान नाही…
बांदा ता.१०: इन्सुली खामदेव नाका येथील ट्रान्सफॉर्मरने (वीज जनित्र) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पेट घेतला.तब्बल अर्धा तास जनित्र पेट घेत होते.दरम्यान त्या ठिकाणाहून प्रवास करणारे सावंतवाडी शिवसेनेचे कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी याबाबतची माहिती बांदा पोलीस स्टेशन तसेच वीज अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तात्काळ सर्व यंत्रणा हलली, दरम्यान वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत,वीज पुरवठा खंडित केला.त्यामुळे याठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला.
यामुळे बांदा शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तात्काळ आग विझविल्याने जानित्राचे नुकसान झाले नाही. शॉर्टसर्किट झाल्याने स्पार्किंग झाल्याचे अभियंता आपटेकर यांनी सांगितले. रात्रीच युद्धपातळीवर जनित्राची दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.