पालकमंत्री उदय सामंतांचा १२ व १३ जानेवारीला सिंधुदुर्ग दौरा…

2

सिंधुदुर्गनगरी ता.१०: राज्‍याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक १२ व १३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा जिल्‍हा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

रविवार दिनांक 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.00 वा. खारेपाटण येथे आगमन व कार्यकर्त्यामसवेत संवाद, स. 10.25 वा. खारेपाटण येथून मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, 11.00 वा. वैभववाडी येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दुपारी 12.00 वा. वैभववाडी येथून मोटारीने कणकवलीकडे प्रयाण, 12.45 वा. कणकवली येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दु. 1.30 ते 2.30 वा. आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी राखीव, दु. 2.30 वा. कणकवली येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण, दु. 3.30 वा. देवगड येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दु. 4.30 वा. देवगड येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण, सायं. 5.30 वा. मालवण येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, साय 6.30 वा. मालवण येथून मोटारीने कुडाळ कडे प्रयाण, सायं. 7.30 वा. कुडाळ येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, रात्री 8.30 वा. कार्यक्रमस्थळावरून मोटारीने एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण, रात्री 9.00 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व मुक्काम.

सोमवार दि. 13 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.00 वा. एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळ येथे कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी, स. 10.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण, 11.00 वा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे 31 वे रस्ता सुरक्षा अभियान – 2020 उद्घाटन समारंभास उपस्थिती, 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन डी.पी.डी.सी हॉल येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी यांच्या समवेत जिल्हा सर्व विभाग आढावा बैठक, दुपारी 1.30 ते 2.30 वा. राखीव, दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा पर्यटन अधिकारी, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, व संबंधित सर्व अधिकारी यांच्या समवेत चांदा ते बांदा व पर्यटन आढावा बैठक, दु. 3.45 वा. पत्रकार परिषद, दु. 4.00 वा. ओरोस सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने वेंगुर्लेकडे प्रयाण, 4.30 वा. वेंगुर्ले येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, सायं. 5.00 वा. वेंगुर्ले येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण, सायं. 5.30 वा. सावंतवाडी येते आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, सायं. 6.30 वा. सावंतवाडी येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण, 7.15 वा. दोडामार्ग येथे आगमन व शिवसेना कार्यकर्ता मेळावा, रात्री 8.30 वा. दोडामार्ग येथून मोटारीने गोवा विमानतळाकडे प्रयाण.

4