वेंगुर्ले नगर वाचनालयाच्या निबंध व गायन स्पर्धेत असोली हायस्कूलचे यश…

2

वेंगुर्ले ता.१०: नगर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कै.महादेव विठोबा कुमठेकर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत असोली हायस्कूलच्या कु.ऋतुजा दशरथ नाईक हिने तृतीय क्रमांक पटकाविला,तर कै.भालचंद्र शंकरराव कर्पे स्मृती नाट्य गायन स्पर्धेत कु.आदित्य नंदकिशोर धुरी याला दुसरा क्रमांक मिळाला.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर दिप्तेश मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सेक्रेटरी सदानंद गावडे,विजय धुरी तसेच प्रशालेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

4