बांद्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांना वाहतूक विभागाकडून माहिती…

2

बांदा ता.१०: मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथे रस्ता सुरक्षा अभियान अतंर्गत ‘रेझिंग डे सप्ताह’ निमित्त वाहन चालकांना वाहतूक नियम, दंड, इंटरसेप्टर कारबाबत महामार्ग वाहतूक विभागाकडून माहिती देण्यात दिली.
इंटरसेप्टर कार मध्ये असलेले स्पीडगनद्वारे अतिवेगाने चालणाऱ्या वाहनावर कशा प्रकारे कारवाई करण्यात येते याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. महामार्ग पोलिस मदत केंद्रास सर्व सुविधा असलेले वाहन मिळालेले आहे. रेझिंग डे सप्ताहानिमीत्ताने पोलीस उप निरीक्षक उमाकांत पालव, सहाय्यक पो. उपनिरीक्षक प्रदिप पुजारे, पो. नाईक डी. सी. कणसे, पो. नाईक सी. एम. डिसोझा
पो. कॉ. बी. एल. नाईक यांच्या टीमने इंटरसेप्टर कार व त्यामधील अत्याधुनिक तंत्रज्ञान याची माहिती देऊन महामार्गावर होणारे अपघातांना आळा घालण्यासाठी करत असलेल्या विविध उपाययोजना याबाबतची सविस्तर माहीती उपस्थितांना दिली.
सर्व माहिती वाहनचालकांना देणे व माहिती असणे आवश्यक असून रस्त्यावर वाहन चालवत असताना सर्व सामान्य लोकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघातास आळा बसेल असा विश्वास पोलीस उप निरीक्षक उमाकांत पालव यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गात गेल्या दोन महीन्यात वेगमर्यादा ओलांडणाऱ्या सहाशे वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याचे यावेळी
सांगण्यात आले. यावेळी मद्यपी चालकांवरील ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी कारवाई तसेच काळ्या काचांवरील कारवाई याबाबतही माहीती देण्यात आली.

4